Rumor has it that Gajanan Maharaj Temple is closed 
विदर्भ

गजानन महाराज मंदिर बंद असल्याची अफवाच

सकाळ वृत्तसेवा

शेगाव (जि.बुलडाणा) :  कोरोना व्हायरस या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीकोनातून विदर्भ पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथील गजानन महाराज मंदिर बंद असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरविल्या जात आहे. मात्र, गजानन महाराज मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुलेच राहणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.


कोरोना व्हायरसमुळे येणारे उत्सव स्थगित केल्यामुळे येणाऱ्या दिंड्यानी व भाविक भक्तांनी सर्व बाबींचा विचार करुन गर्दी होऊ नये याची दक्षता घेऊन प्रवास टाळावा. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आनंदसागर परिसरात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन निर्देशानुसार आनंदसागर बंद ठेवण्यात येत आहे. भाविकांनी, वारकऱ्यांनी व सर्व संबंधीतांनी कृपया याची नोंद घ्यावी. तसेच मंदिर नेहमीप्रमाणे सुरू राहील रामनवमी उत्सव शेगावात येणाऱ्या दिंड्या यांना फोनद्वारे मेसेज देत कोरोना व्हायरस मुळे येवू नका अशा सूचना दिल्या आहेत. गर्दी लक्षात घेऊन फक्त आनंद सागरच काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती मंदीर प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल मेसेज फेक असून असल्याचेही सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT